बेळगाव लाईव्ह :
बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलिसांनी बेकायदेशीर ‘अंदर-बाहर’ जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेतले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून जुगाराच्या अड्ड्यावर सुरू असलेला प्रकार उधळून लावला.
कारवाईदरम्यान रोख रक्कम, पत्त्यांचे संच आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. संबंधितांविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हिरेबागेवाडी पोलीस करत आहेत.
जिल्ह्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर सातत्याने कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





