belgaum

गावठाण जमीन शाळांसाठी मंजूर करण्याची पिरनवाडीवासियांची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पिरनवाडी येथील गावठाण जमिनीतील 8 एकर जागा कन्नड, मराठी व उर्दू शाळेच्या इमारतीसह इतर विकास कामांसाठी मंजूर करण्यात यावी, अशी मागणी समस्त पिरनवाडी गावकऱ्यांनी पिरनवाडी पट्टणपंचायतीकडे केली आहे.

पिरनवाडी पट्टणपंचायतीच्या आवारामध्ये आज बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन पंचायतीचे सीईओ चौगला यांना सादर केले.

पिरनवाडी गावातील सरकारी मराठी, कन्नड व उर्दू या तीनही उच्च प्राथमिक सरकारी शाळा जांबोटी महामार्गावर म्हणजे राष्ट्रीय महामार्गाशेजारी आहेत. या शाळांच्या आसपास मोठी वसाहत निर्माण झाली आहे. या वसाहतीतील रहदारीच्या गोंगाटासह महामार्गावरील सतत येजा करणाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे.

 belgaum

महामार्गावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अवजड वाहनांचा धोका निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने गावातील सर्व्हे नं. 21 मधील 12 एकर 10 गुंठे गावठाण जमिनीपैकी 8 एकर जमीन कन्नड, मराठी व उर्दू शाळेच्या इमारतीसह इतर विकास कामांसाठी मंजूर करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी पिराजी मुचंडीकर, सचिन गोरले, शिवाजी शहापूरकर, सतीश पाटील, आप्पाजी मुचंडीकर, सुप्रीत संगमी, गणपत पोळ, पिराजी सुळगेकर, यल्लाप्पा शिंदे, कृष्णाबाई आपटेकर आदिंसह पिरनवाडी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.