belgaum

मराठी SIR अर्जावर रोशन यांची मोठी घोषणा!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेतील मराठी अर्जाच्या मागणीबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठीसह विविध संघटना आणि राजकीय पक्षांशी चर्चा झाल्यानंतर मराठी भाषेतील नमुना अर्ज (Sample Form) मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रोशन म्हणाले, “ही संपूर्ण प्रक्रिया मतदारांच्या सोयीसाठी राबवली जात आहे. अर्जावर क्यूआर कोड असल्यामुळे प्रत्येक भाषेत स्वतंत्र अर्ज छापणे सध्या शक्य नाही. त्यामुळे ज्या भागात मराठी भाषिक मतदारांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी बीएलओंकडे मराठी नमुना अर्ज ठेवण्यात येईल.”

ते पुढे म्हणाले की, “मराठी नमुना अर्जाच्या आधारे मतदारांना कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची, याचे मार्गदर्शन बीएलओ करतील. मूळ अर्ज इंग्रजी आणि कन्नडमध्ये उपलब्ध राहतील, तर मराठीसह इतर भाषांतील नमुना अर्ज मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील.”

 belgaum

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, या व्यवस्थेला सर्व राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली असून सध्या या संदर्भात कोणताही वाद किंवा अडचण नाही. मतदारांनी अर्ज भरून आवश्यक स्वाक्षरी करून तो सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.