belgaum

महापालिका कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR – Special Intensive Revision) मोहिमेचे प्रभावीपणे कामकाज पार पाडणाऱ्या बेळगाव महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.

बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निवडणूक शाखेला आकस्मिक भेट देत उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांत सुरू असलेल्या SIR मोहिमेची तसेच संगणकीकरणाच्या कामाची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

यावेळी विश्रांती न घेता मोहिमेच्या यशासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. विशेष म्हणजे, बोलण्यात अडचण असतानाही उत्कृष्ट कार्य करणारे कर्मचारी विशाल माविनकट्टी यांच्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

 belgaum

महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व समन्वयामुळे SIR मोहिमेत चांगली प्रगती साधता आली असून, हे काम इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देऊन परिसरातील उद्यानाच्या सुस्थितीबद्दलही समाधान व्यक्त केले.

महापालिकेचे महसूल विभागाचे उपआयुक्त तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना SIR मोहिमेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी महापालिकेतील अधिकारी, पर्यवेक्षक तसेच SIR मोहिमेतील कर्मचारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.