belgaum

बडेकोळ मठाजवळ पुन्हा भीषण अपघात;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील बडेकोळ मठाजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. मुसळधार पावसात नियंत्रण सुटलेल्या एका ट्रकने महामार्गावर पलटी घेतल्याने पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली.

घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रक हटविण्याचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

सततच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

 belgaum

विशेष म्हणजे, बडेकोळ मठाजवळील याच ठिकाणी गेल्या आठवडाभरात सहा अपघात घडले आहेत. त्यामुळे या परिसरात तातडीने सुरक्षाव्यवस्था मजबूत करून बॅरिकेड्स, इशारा फलक, वेगमर्यादा नियंत्रण व्यवस्था आणि अन्य सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

विशेष म्हणजे, बडेकोळ मठाजवळील हा घाट परिसर ‘डेंजर झोन’ म्हणून ओळखला जातो. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वी वेगमर्यादा फलक, रिफ्लेक्टर, सूचना फलक आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या होत्या. मात्र, या उपाययोजनांनंतरही याच ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या आठवडाभरात सहा अपघात झाल्याची नोंद आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या ठिकाणी अधिक मजबूत बॅरिकेड्स, रंबल स्ट्रिप्स, अतिरिक्त इशारा फलक, सीसीटीव्ही आणि वेग नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा तातडीने उभारण्याची मागणी केली आहे. भविष्यात मोठी जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने या डेंजर झोनमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.