belgaum

मराठी फलकांच्या मुद्द्यावर प्रशासनाचे समितीला पत्र;

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह: मराठी भाषेतील फलकांच्या वापराबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने समितीला अधिकृत पत्र देत संबंधित विभागांना नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.


मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ३ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या निवेदनात बेळगाव शहर, बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी तालुक्यातील शासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दर्शनी फलकांवर पूर्वीप्रमाणे मराठी भाषेचाही समावेश करावा, अशी मागणी केली होती.


यासोबतच काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून खासगी दुकाने व व्यावसायिक आस्थापनांवरील मराठी फलकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणीही समितीने केली होती.

 belgaum


या तक्रारीनंतर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हा नगरविकास कक्षाचे प्रकल्प संचालक आणि कन्नड व संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालकांना पत्र पाठवून या विषयाची तपासणी करून शासनाच्या परिपत्रकानुसार आणि प्रचलित नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या या पत्राची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीलाही देण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवर प्रशासनाने अधिकृतपणे दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाकडून पुढे कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता सीमाभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.