बेळगाव लाईव्ह: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR – Special Intensive Revision) अभियानाला वेग आला आहे. जिल्ह्यातील सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथस्तरीय अधिकारी (BLO) घराघरांत जाऊन मतदारांकडून माहिती संकलित करत असून, २१ जुलैपर्यंत २५.७४ लाख अर्जांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण ४१.०७ लाख नोंदणीकृत मतदार होते. या सर्व मतदारांसाठी आवश्यक एन्युमरेशन फॉर्म छापून बीएलओंना वितरित करण्यात आले. त्यापैकी ३८.४३ लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे.
३० जूनपासून सुरू झालेल्या मोहिमेत आतापर्यंत ४१.१३ लाख मतदारांपर्यंत फॉर्म पोहोचविण्यात आले असून, २५.७४ लाख अर्जांची ऑनलाइन नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

मतदारसंघनिहाय ऑनलाइन नोंदणी
- बेळगाव ग्रामीण – १,७५,७८४ (सर्वाधिक)
- हुक्केरी – १,५२,०९५
- कागवाड – १,४६,१५१
- अरभावी – १,४३,२३४
- रायबाग – १,४२,५६१
- यमकनमरडी – १,३७,१९८
- कित्तूर – १,३६,२९७
- रामदुर्ग – १,२९,६४२
- चिक्कोडी-सदलगा – १,१९,२५५
- बेळगाव दक्षिण – १,१६,०७७
- बेळगाव उत्तर – ८५,१७९
- सौंदत्ती-यल्लम्मा – १,५१,३४८ (तर बेळगाव उत्तरमध्ये सर्वात कमी नोंदणी)
जिल्हा प्रशासनाने उर्वरित मतदारांनीही बीएलओंना आवश्यक माहिती देऊन विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.





