belgaum

ऑटो चालकांसाठी 15 दिवसांची मुदत; मीटर सक्ती, रॅपिडोवर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील ऑटो प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत जिल्हा प्रशासनाने शहर हद्दीतील सर्व ऑटो-रिक्षांमध्ये 15 दिवसांच्या आत मीटर बसवणे बंधनकारक केले आहे. तसेच परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो बाईक टॅक्सी, दुचाकी आणि खासगी पांढऱ्या नंबरच्या कारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उपायुक्त तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे (RTA) अध्यक्ष मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आरटीओ, पोलीस अधिकारी तसेच ऑटो चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मीटरनुसारच ऑटो भाडे

प्रशासनाने मंजूर केलेले नवीन दर पुढीलप्रमाणे आहेत:

 belgaum
  • पहिले 1.6 किमी – ₹37
  • त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी – ₹15

यापुढे शहरात मीटरनुसारच भाडे आकारणे बंधनकारक राहणार असून नियम मोडणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई केली जाणार आहे.

रॅपिडो आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कारवाई

प्रशासनाने आरटीओ आणि पोलिसांना रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी, भाड्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी आणि परवान्याशिवाय व्यावसायिक वापरात असलेल्या खासगी कारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवीन ऑटो नोंदणीवर निर्बंध

शहरातील वाढती ऑटोसंख्या आणि विद्यमान चालकांचे घटते उत्पन्न लक्षात घेऊन नवीन ऑटो नोंदणीवरही निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ऑटो संघटना आणि डीलर्सशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

नोंदणी नूतनीकरण न केलेले किंवा फिटनेस नसलेले ऑटो शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. तसेच प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन ऑटोचालकांना करण्यात आले आहे.


 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.