belgaum

लॉज व्हिक्टोरिया क्र. 9 च्या माध्यमातून ‘या’ बॉक्सरला आर्थिक मदत

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :लॉज व्हिक्टोरिया क्र. 9 या संस्थेने बेळगाव येथील राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर गौरी हलगेकर हिला तिच्या तातडीच्या गरजेसाठी 5,000 रुपयांची स्तुत्य अशी आर्थिक मदत देऊ केली आहे.

गौरी पी. हलगेकर ही सध्या जालंधर (पंजाब) येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे 22 जून ते 30 जून 2026 या कालावधीत आयोजित ‘5 व्या उपकनिष्ठ मुला -मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ या स्पर्धेत कर्नाटक ॲमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे गौरीला वरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता पैशाची गरज होती.

त्या संदर्भात बेळगावमधील गांधीनगर येथे राहणाऱ्या तिच्या पालकांनी आज सकाळी 7:30 वाजता फेसबुक फ्रेंड्स सर्कल’चे प्रमुख संतोष आर. दरेकर आणि ‘हॉकी बेळगाव’चे सरचिटणीस सुधाकर चाळके यांना फोन करून मदतीची विनंती केली. तेंव्हा त्यांनी ताबडतोब आपले मित्र एक्सपर्ट व्हॉल्व्हज अँड इक्विपमेंट्स प्रा. लि.’ उद्यमबागचे व्यवस्थापकीय संचालक विनायक लोकूर यांना संपर्क साधला.

 belgaum

तसेच गौरीच्या पालकांना घेऊन लोकूर यांचा कारखाना गाठला. त्या ठिकाणी विनायक लोकूरे यांनी लॉज व्हिक्टोरिया क्र. 9 च्या माध्यमातून 5 हजार रुपयांची रक्कम गौरीच्या पालकांकडे सुपूर्द केली आणि त्यांनी ती त्वरित गौरीकडे हस्तांतरित केली.

या तत्पर मदतीबद्दल लॉज व्हिक्टोरिया क्र. 9 मधील सर्व सदस्यांचे गौरीचे पालक तसेच दरेकर व चाळके यांनी आभार मानले आहेत. गौरीने पंजाबमधील तिचा पहिला सामना जिंकला असून, तिचा पुढील सामना लवकरच होणार आहे.

लॉज व्हिक्टोरिया नं. 9, बेळगावतर्फे विश्वबंधुत्व दिन उत्साहात साजरा

लॉज व्हिक्टोरिया नं. 9 या संस्थेतर्फे बेळगाव येथील एक्सपर्ट व्हॉल्व्हज अँड इक्विपमेंट्स प्रा. लि. येथे विश्वबंधुत्व दिन सेवेच्या खोल भावनेने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमांमध्ये विश्वबंधुत्वाच्या कालातीत मूल्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि समाजाला आठवण करून देण्यात आली की, माणुसकी जात, पंथ, धर्म आणि पार्श्वभूमीच्या सर्व अडथळ्यांच्या पलीकडे आहे. याप्रसंगी बोलताना डॉ. मुकुंद उडचणकर यांनी विश्वबंधुत्व हे केवळ एक तत्त्वज्ञान नसून एक जीवनशैली आहे, जी अर्थपूर्ण कृतीला प्रेरणा देते, समाजाला मजबूत करते आणि निःस्वार्थ सेवेला प्रोत्साहन देते, यावर जोर दिला. विश्वबंधुत्व दिनानिमित्त लॉजने अनेक प्रभावी सेवाभावी उपक्रम आयोजित केले होते. एका रक्तदान शिबिरात यशस्वीरित्या 60 युनिट रक्त संकलित करून केएलई रुग्णालयाला दान करण्यात आले. लॉजने एकल विद्यालयाला पाठिंबा देताना श्रेया अहिरे (15,000 रु.), डेलनाझ (23,700 रु.) आणि मुस्तयीन सौदागर (23,000 रु.) या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून शिक्षणाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे बेळगाव येथील गुणवान तरुण बॉक्सर कु. गौरी पी. हलगेकर यांना देण्यात आलेली आर्थिक मदत होय. गौरी सध्या पंजाबमधील जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे आयोजित ‘5 व्या सब-ज्युनियर मुला -मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप’मध्ये कर्नाटक ॲमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करत आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची तिची जिद्द, कठोर परिश्रम आणि समर्पण यांची दखल घेत लॉज व्हिक्टोरिया नं. 9 ने तिला या प्रतिष्ठित स्पर्धेतील सहभागासाठी 5000 रु.ची आर्थिक मदत प्रदान केली. तसेच ‘सिऑन आश्रम’च्या माध्यमातून एका गरजू रुग्णाच्या उपचारांसाठी लॉजने 30,000 रु.ची मदत दिली. इतर सेवाभावी उपक्रमांमध्ये ‘कियान चिल्ड्रन्स होम’ला धान्य दान (8000 रु.), ‘संत मीरा स्कूल’च्या ग्रंथालयाला पुस्तके भेट (25,500 रु.), ‘विद्या आधार’ला रद्दी दान (2000 रु.) आणि ‘वनमहोत्सवा’अंतर्गत रोपांचे वाटप (3000 रु.), यांचा समावेश होता. या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या सेवाभावी आणि समाजोपयोगी कार्यांचे एकूण मूल्य 1,60,200 रु. इतके होते. कार्यक्रमास सुबोध कित्तूर, लॉज व्हिक्टोरिया ट्रस्टचे अध्यक्ष दीपक जगदाळे, सचिव विनायक लोकूर, कोषाध्यक्ष जमशेद मेहता, उपक्रम अध्यक्ष राहुल साठे यांच्यासह अनेक सदस्य आणि लेडीज विंगच्या सदस्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.