belgaum

करीकट्टी क्रॉस येथे सीसीबीची धडक कारवाई;

0
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी गांजा विक्रीविरोधात मोठी कारवाई करत 3 किलो गांजा, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण रु. 1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्युंजय भीमसेप्पा जडगी (वय 19, रा. यल्लापूर, ता. हुक्केरी) हा आरोपी विक्रीसाठी गांजा घेऊन येत असल्याची माहिती सीसीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार करीकट्टी क्रॉस, भीमगड, गोकाक–बेळगाव मार्गावर सापळा रचून कारवाई करण्यात आली.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

 belgaum

कारवाईदरम्यान आरोपीकडून रु. 1.50 लाख किमतीचा 3 किलो गांजा, रु. 30 हजार किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल, एक विवो मोबाईल फोन आणि रु. 5 हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रु. 1 लाख 85 हजार इतकी आहे.

या प्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 83/2026 नोंद करण्यात आला असून एनडीपीएस कायदा कलम 20(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या यशस्वी कारवाईबद्दल सीसीबीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.