belgaum

शहापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; १२ हून अधिक नागरिकांना घेतला लचका

0
246
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील शहापूर भागातील जेड गल्ली, अळवण गल्ली आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत १२ हून अधिक लोक जखमी झाले असून, अनेक दुचाकींचेही नुकसान झाले आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सात कुत्र्यांचा कळप अचानक आक्रमक झाला असून येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांवर ते हल्ले करत आहेत. विशेष म्हणजे, हेच कुत्रे पूर्वी शांत होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वर्तनात अचानक बदल झाला आहे.

कुत्र्यांनी आता रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींच्या सीट कुशनचेही नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळी जेड गल्लीत उभ्या असलेल्या तीन दुचाकींचे सीट कव्हर या कुत्र्यांनी फाडून टाकले.

 belgaum

स्थानिक रहिवासी जॉर्ज रॉड्रिग्ज हे देखील या हल्ल्याचे बळी ठरले आहेत. घरासमोर दुचाकी पार्क करत असताना एका कुत्र्याने त्यांच्या पायाचा लचका घेतला. रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, “मी नेहमी या कुत्र्यांशी प्रेमाने वागतो, पण त्यांच्या या अचानक आक्रमकतेमुळे मी चक्रावून गेलो आहे.” या घटनेनंतर त्याच कुत्र्यांच्या कळपाने त्यांच्या दुचाकीच्या सीटचेही नुकसान केले.

या समस्येबाबत बेळगाव महानगरपालिकाआणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. स्थानिक नगरसेवक जयंत जाधव यांनी सांगितले की, त्यांनी या विषयावर महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पालिकेचे पथक अनेकदा कुत्र्यांना पकडण्यासाठी आले, पण पथक येताच कुत्री पसार होतात. प्रशासनाने लवकरच यावर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.