belgaum

शिवम असोसिएट्स प्रकरणात नियमबाह्य ठेवींचा प्रथमदर्शनी पुरावा : DC

0
150
 belgaum

 belgaum


बेळगाव लाईव्ह : शिवम असोसिएट्स आर्थिक घोटाळा प्रकरणात प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून समन्वयाने सखोल तपास करून कायदेशीर कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. या प्रकरणात महसूल व पोलीस खात्याने केलेल्या तपासकार्याचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले की, आर्थिक घोटाळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘केपीआयडी-पड्स कोऑर्डिनेशन सेल’ची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसेच सहकार आणि व्यावसायिक कर खात्याचे अधिकारी सहभागी आहेत. समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या माहितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटका प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शिअल एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट-2004 (KPID) आणि प्लॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स (PUDS) कायद्यांतर्गत तपास करण्यात आला. मार्केट इंटेलिजन्स रिपोर्टच्या आधारे शिवम असोसिएट्सने आरबीआय, सेबी किंवा सहकार खात्याच्या नियमांचे पालन न करता मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून हजारो लोकांकडून बेकायदेशीर ठेवी गोळा केल्याचा संशय निर्माण झाला होता.
याप्रकरणी सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांना प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चार ठिकाणी पडताळणी आणि तपासानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात केपीआयडी आणि पड्स कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी शिवम असोसिएट्सवर कारवाई केली.
दुसऱ्या टप्प्यात सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपशीलवार चौकशी सुरू केली आहे. या पथकात उपविभागीय अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आणि सहकार खात्याचे जिल्हा निबंधक यांचा समावेश आहे. संशयास्पद जाहिराती, सोशल मीडिया माहिती आणि मार्केट इंटेलिजन्स रिपोर्टच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.