belgaum

अँटी स्टॅबिंग स्कॉडकडून एकाला अटक; लांब धारदार कोयता जप्त

0
288
Cop bgm
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील मारुतीनगर तिसऱ्या क्रॉस जवळ सार्वजनिक ठिकाणी हातात प्राणघातक शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला माळमारुती पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्कॉडने अटक करून त्याच्या जवळील लांब धारदार ऊस तोडणी कोयता जप्त केला.




कॅम्प येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चौघांना अटक



कॅम्प, बेळगाव येथील धोबीघाटा जवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर काल कॅम्प पोलीसांनी धाड टाकून चौघा जणांना अटक केली. तसेच त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य जप्त केले.




पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव लालाखान बाबूखान पठाण (वय 50, रा. मारुतीनगर, बेळगाव) असे आहे. बेळगाव शहरात अलीकडे वाढलेल्या स्टॅबिंग अर्थात भोसका भोसकीच्या प्रकारांना आळा घालून कायदा व सुव्यवस्था अभाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरासह ग्रामीण उपविभागातील सर्व पोलीस ठाण्याच्या व्याप्तींमध्ये अँटी स्टॅबिंग स्क्वाडची स्थापना केली आहे.


त्यापैकी काल बुधवारी गस्तीवर असलेल्या माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील अँटी स्टॅबिंग स्क्वाडला लालाखान पठाण हा दहशत निर्माण करण्याच्या किंवा एखादे गैरकृत्य करण्याचा उद्देशाने मारुतीनगर तिसऱ्या क्रॉस जवळ सार्वजनिक ठिकाणी हातात ऊस तोडणीचा कोयता घेऊन वावरत असल्याचे आढळून आले. तेंव्हा स्क्वाड मधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील लांब धारदार कोयता जप्त केला. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.



पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे अलेक्स फ्रान्सिस (वय 38, रा. लक्ष्मीनगर हिंडलगा बेळगाव), अम्म लक्ष्मण लमानी (वय 19, मुळ नागराळ तांडा ता. बेळगी जि. बागलकोट, सध्या रा. हिंडलगा बेळगाव), सुदीप लक्ष्मण लमानी (वय 21. रा. वैभवनगर बेळगाव) आणि महेश गोपाळ पाटील (वय 48, रा. गणेश मंदिरामागे गणेशपुर बेळगाव) अशी आहेत. हे सर्वजण काल बुधवारी कॅम्प येथील धोबीघाटाजवळ सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे लावून पत्त्यांचा जुगार खेळत होते. याबाबतची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुक्मिणी एम. यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने धाड टाकून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील जुगाराचे साहित्य जप्त केले याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.