belgaum

शिवजयंती शांततेत पार; विकास कलघटगी यांचा पोलीसांकडून गौरव

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावशहरातील शिवजयंती उत्सव आणि भव्य चित्ररथ मिरवणूक यंदा उत्साहात आणि पूर्णतः शांततेत पार पडली. या यशामागे अनेकांचे योगदान असून, त्यामध्ये शिवजयंती मंडळ आणि प्रशासनात समन्वय साधणारे विकास आर. कलघटगी यांची भूमिका विशेष ठरली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पोलीस विभागाने त्यांचे कौतुक करत प्रशंसापत्र प्रदान केले आहे.


21 एप्रिल 2026 च्या सायंकाळपासून 22 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरात विविध ठिकाणी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वय साधला.

विशेषतः स्थानिक परिस्थितीबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करून विकास कलघटगी यांनी पोलीस यंत्रणेला मोलाचे सहकार्य केले. पोलिस आयुक्त बोरसे यांनी कलघटगी यांना यावेळी प्रशस्ती पत्र पुस्तिका देऊन गौरव केला आहे.

 belgaum

यापूर्वीही गणेशोत्सव काळात त्यांनी अशाच प्रकारे सहकार्य केल्याचे नमूद करत पोलीस आयुक्त बोरसे भूषण गुलाबराव (आयपीएस) यांनी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले आहे. तसेच पुढील काळातही असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

शिवजयंती उत्सव शांततेत पार पडण्यासाठी विविध संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे बेळगाव शहराने पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.