belgaum

एसएसएलसी निकालात मराठीची उपेक्षा?

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (KSEAB) गुरुवारी एसएसएलसी परीक्षेचा निकाल जाहीर केला. मात्र, सुरुवातीला या ऑनलाइन निकालात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. निकाल पाहताना पोर्टलवर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम भाषा मराठी’ असा उल्लेखच करण्यात आलेला नाही, ज्यामुळे सीमाभागातील मराठी प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, ऑनलाइन निकालाच्या पोर्टलवर इंग्रजी आणि कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या विषयांचा आणि भाषांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत विषयाचे नाव असलेल्या रकान्यात ‘मराठी’ हा शब्दच गायब आहे.

त्याऐवजी केवळ विषयाचा कोड आणि गुण दाखवण्यात आले आहेत. इतर सर्व भाषांची नावे स्पष्टपणे दिसत असताना केवळ मराठीच्या बाबतीतच असा प्रकार का घडला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 belgaum

या तांत्रिक त्रुटीमुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. “मराठी भाषेला जाणूनबुजून दुय्यम वागणूक दिली जात आहे का?” अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी सीमाभागातील हजारो विद्यार्थी मराठी माध्यमातून ही परीक्षा देतात, अशा वेळी बोर्डाच्या स्तरावर झालेली ही चूक अक्षम्य मानली जात आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन शिक्षण विभागाने तातडीने पोर्टलवरील त्रुटी दूर करावी आणि मराठी भाषेचा सन्मानाने उल्लेख करावा, अशी मागणी पालकांकडून आणि विविध मराठी संघटनांकडून केली जात आहे.

दरम्यान शिक्षण खात्याला ही चूक लक्षात येताच चूक दुरुस्त करून त्या ठिकाणी मराठी विषयाचा उल्लेख करण्यात आला आहे. ही केवळ तांत्रिक अडचण होती काही वेळानंतर वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचण दूर झाल्यावर आपोआप मराठी हा विषय उल्लेख करण्यात आला आहे असे स्पष्टीकरण ही शिक्षण खात्याकडून देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.