बेळगाव लाईव्ह :राज्यातील इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलेला पिढ्यान पिढ्या प्रेरणा स्त्रोत राहिलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय नकाशात समाविष्ट केला जावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शरद पवार गटातच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाप्रमुख दुर्गेश मेत्री यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) कर्नाटक राज्याचे सदस्य आणि पदाधिकारी एनसीईआरटी समितीने इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याबद्दल तुम्हाला निवेदन देत आहोत.

हा नकाशा अभ्यासक्रमातून वगळणे म्हणजे पिढ्यानपिढ्या प्रेरणास्रोत राहिलेल्या आपल्या भारतीय ऐतिहासिक साहसाला पुसून टाकण्यासारखे आहे.
ही गुन्हेगारी बाब नसली तरी यामुळे देशाची प्रतिष्ठा पुसली जात आहे. यासाठी आमची विनंती आहे की, तुम्ही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि सदर बाब एनसीईआरटी समितीच्या निदर्शनास आणावी. तसेच, ठळकपणे दर्शवलेला नकाशा राष्ट्रीय नकाशात समाविष्ट करावा,
जेणेकरू
न हे प्रकरण राष्ट्रीय मुद्दा बनणार नाही आणि त्याचे जातीय आंदोलनात रूपांतर होणार नाही, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी दुर्गेश मेत्री यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव महांतेश कोळूचे, जोतिबा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील,व्ही. जी. कुट्रे, ॲड. ए. आर. चौधरी आदी उपस्थित होते.





