belgaum

सीईटी परीक्षा पूर्वतयारी बैठक

0
577
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील कुमार गंधर्व सभागृहात बुधवार दिनांक २२ पासून सुरू होणाऱ्या परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी ही परीक्षा अत्यंत जबाबदारीने व गांभीर्याने पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश या बैठकीत देण्यात आले.


बैठकीस उपस्थित असलेल्या परीक्षा प्रमुख, जॉइंट चीफ, ऑब्झर्व्हर तसेच स्क्वॉड सदस्यांना परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक बाबीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणतेही झेरॉक्स सेंटर सुरू राहणार नाही याची दक्षता घ्यावी,

विद्यार्थ्यांच्या ड्रेस कोडसह इतर आवश्यक बाबींवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच पर्यवेक्षकांची लॉटरी पद्धतीने नियुक्ती करून बैठक व्यवस्था पारदर्शक आणि शिस्तबद्ध ठेवावी, अशा सूचनाही यावेळी बेळगावचे कल्पक डी.डी.पी.यू. श्री एम. एम. कांबळे यांनी अत्यंत सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत परीक्षेसंदर्भातील विविध मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना परीक्षेची जबाबदारी अधिक स्पष्टपणे समजली.

 belgaum

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिकोडी विभागाचे प्रभारी डी.डी.पी.यू. श्री कोळी यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री अग्नी, बी.ई.ओ. तसेच डायट कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्राचार्य श्री बंजत्री यांनी केले. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक यशस्वीपणे पार पडली असून आगामी सीईटी परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्याबाबत प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.