belgaum

उदगीर पत्रकार अधिवेशनात सीमा प्रश्नाच्या सह्यांची मोहीम

0
164
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाच्या त्वरित निकालासाठी उदगीर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात सह्यांची व्यापक मोहीम राबविण्यात आली. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पुढाकारातून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना एक लाख सह्यांचे निवेदन देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या मोहिमेत महाराष्ट्रासह सीमाभागातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवून सह्या केल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ‘लोकमत’चे समूह संपादक राजेंद्र दर्डा, आमदार रोहित पवार,

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांच्यासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे सह्या करून मोहिमेला पाठिंबा दिला.

 belgaum

कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, नागपूर, बीड, नांदेड, अहिल्यानगर, नाशिक या भागांतील पत्रकारांसोबतच सीमाभागातील बिदर जिल्ह्यातील भालकी व औराद येथील पत्रकार आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्ष सुहास हुद्दार, प्रतिनिधी शेखर पाटील व कार्यकारणी सदस्य शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सह्यांची मोहीम राबविण्यात येत असून, सीमाप्रश्नावर त्वरित न्याय मिळावा, अशी ठाम भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.