belgaum

जिल्ह्यात इंधन आणि सिलिंडरचा तुटवडा नाही : DC

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
बेळगाव जिल्हा आणि शहरात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी (२४ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, एखाद्या पेट्रोल पंपावरील साठा संपल्यास अवघ्या पाच तासांत तिथे नवीन साठा उपलब्ध करून देण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि पंप मालकांशी यापूर्वीच चर्चा झाली असून, पुरवठा साखळीत कोठेही अडथळा नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

​नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक इंधन साठवणूक करू नये, यासाठी प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. यानुसार, कोणत्याही पेट्रोल पंपावर कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. केवळ वाहनांमध्येच इंधन भरून दिले जाईल. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून इंधन टंचाईबाबत खोटी माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 belgaum

​यावेळी बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही प्रशासकीय भूमिकेची माहिती दिली. अवैध इंधन साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन कडक बंदोबस्त ठेवणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी आणि काही गैरप्रकार किंवा गोंधळ आढळल्यास तात्काळ ‘११२’ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेला अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपसंचालक मल्लिकार्जुन आणि हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष अजय पै उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.