Home बातम्या शहरात तिघा युवकांकडून धारदार तलवार जप्त
belgaum

शहरात तिघा युवकांकडून धारदार तलवार जप्त

0
शहरात तिघा युवकांकडून धारदार तलवार जप्त
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील जुन्या पी. बी. रोड वरील ओव्हर ब्रिज खाली तिघा युवकांना काल सोमवारी अटक करून मार्केट पोलिसांनी त्यांच्याकडील धारदार तलवार जप्त केली.

अटक केलेल्या आरोपींची नावे हर्षराज कुंदन येळ्ळूरकर (वय 20, रा. कपिलेश्वर मंदिर शेजारी), साई महादेव सेनावे (वय 19, रा. टिळकवाडी, बेळगाव) आणि प्रेम प्रशांत कांबळे (वय 20, रा. महाद्वार रोड, बेळगाव) अशी आहेत.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांचे सहकारी काल सोमवारी संशयित व्यक्तींची तपासणी करत असताना महाद्वार रोडवरील माणिक बाग शोरूम शेजारील जुन्या बीबी रोडच्या ओव्हर ब्रिज खाली त्यांना उपरोक्त तिघेजण सापडले.

त्यावेळी पोलिसांनी चौकशी करून तिघांचीही झडती घेतली असता त्यांच्याकडे सापडलेली धारदार तलवार पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, खडेबाजार येथील रामराज या कपड्याच्या दुकानाशेजारी सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे पैसे मटका जुगारावर लावणाऱ्या एका महिलेला काल मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेन केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली. तसेच तिच्याकडील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.