belgaum

बेळगाव इस्कॉनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील सी.टी.एस. क्र. 211 ही मालमत्ता इस्कॉनचीच असून त्या ठिकाणी राहणाऱ्या चार कुटुंबांना न्यायालयीन प्रक्रियेनंतरच बेलिफामार्फत नियमानुसार बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकरणात कोणतीही नियमबाह्य कारवाई झालेली नसल्याचा दावा International Society for Krishna Consciousness (इस्कॉन) बेळगावतर्फे करण्यात आला आहे.

यासंदर्भात इस्कॉनच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन तसेच पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. काही माध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

इस्कॉनच्या माहितीनुसार, संबंधित जागा 2003 साली नोंदणीकृत निरंतर पट्टाने घेण्यात आली होती. त्यावेळी त्या ठिकाणी एकूण 14 कुटुंबे वास्तव्यास होती. इस्कॉनने सर्व कुटुंबांना जागा रिकामी करण्याची विनंती करून पर्यायी जागा घेण्यासाठी व घरे बांधण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार 10 कुटुंबांनी स्वेच्छेने स्थलांतर केले.

 belgaum

मात्र चार कुटुंबांनी स्थलांतरास नकार दिल्याने इस्कॉनकडून मूळ दावा क्र. 390, 392, 508 व 489/2017 दाखल करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने इस्कॉनच्या बाजूने निर्णय दिला. संबंधित कुटुंबांनी केलेली अपिलेही न्यायालयाने फेटाळून लावली.

त्यानंतर न्यायालयाने ई.पी. क्र. 144, 145, 146 व 147 अन्वये संबंधित घरे मोकळी करून जागा इस्कॉनच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानुसार बेलिफामार्फत कारवाई करण्यात आली असल्याचे इस्कॉनने स्पष्ट केले आहे.

सत्य परिस्थिती अशी असताना काही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत असून त्या पूर्णतः खोट्या असल्याचे इस्कॉनने नमूद केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.