belgaum

मागण्या पूर्ण न झाल्यास सरकारी डॉक्टरांचा बेमुदत संपाचा इशारा

0
550
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सार्वजनिकांच्या हितासाठी आपल्या विविध मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास येत्या दि. 11 मार्चपासून दंडावर काळ्या फिती बांधून प्रतिकात्मक निषेध आंदोलन आणि त्यानंतर दि. 16 मार्च 2026 पासून काम थांबून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्नाटक सरकारी वैद्याधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्नाटक राज्य आरोग्य व वैद्यकीय शिक्षण खाते कर्मचारी केंद्र संघ आणि खात्याच्या सर्व वैद्य संघटनांनी दिला आहे.

कर्नाटक सरकारी वैद्यकीय संघटना, कर्नाटक राज्य आरोग्य व वैद्यकीय शिक्षण खाते कर्मचारी केंद्र संघ आणि खात्याच्या सर्व वैद्य संघटनांच्यावतीने मल्लिकार्जुन बळ्ळारी, डाॅ. रवींद्रनाथ एम. मेटी, डाॅ. तिर्मराजु पी. आर. यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणी वजा इशाराचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटल्सना वेळोवेळी समर्पकरीत्या औषध पुरवठा केला जावा, आरोग्य खात्यातील सर्व डॉक्टरांची ज्येष्ठता यादी वेळोवेळी प्रसिद्ध करावी, आरोग्य खात्याच्या बदली कायद्यातील न्यूनता दूर करून अवैज्ञानिक कौन्सिलिंग बदली प्रक्रियेला आळा घालावा, सार्वजनिकांना उत्तम सेवा देण्यासाठी खात्यातील रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या रिक्त असलेल्या जागा तातडीने भरावात, कंत्राटी डॉक्टर कर्मचारी आणि एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा आणि वेळोवेळी वेतन वाढ दिली जावी वगैरे विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.

 belgaum

सरकारने आपल्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी, अन्यथा येत्या दि. 11 ते दि. 15 मार्चपर्यंत आपत्कालीन सेवा विभाग वगळता इतर विभागांमध्ये दंडावर काळ्या फिती बांधून काम करण्याद्वारे प्रतिकात्मक निषेध नोंदवला जाईल.

त्याचीही दखल घेण्यात आली नाही तर त्यानंतर दि. 16 मार्च 2026 पासून काम थांबून सरकारी हॉस्पिटल्स मधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी काम थांबवून बेमुदत संपावर जातील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन सादर केल्यानंतर आपल्या विविध मागण्या संदर्भात आरोग्य आरोग्य खाते कर्मचारी संघाचे राज्याध्यक्ष मल्लिकार्जुन बळ्ळारी आणि प्रसिद्धी माध्यमांना अधिक माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.