बेळगाव लाईव्ह :युवासेना-शिवसेना बेळगांव यांचा वतीने भव्य किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याच्या माध्यमातून लहान मुले आणि युवकांना किल्ले साकारण्यासाठी प्रोत्साहित करून छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा उपक्रम.
या स्पर्धेत बेळगांव शहर परिसर व ग्रामीण भागातील तब्बल २५ मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण ५ विजेते व २ उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक -१७/११/२५ रोजी करण्यात येणार आहे तरी कार्यक्रम स्थळ स्पर्धकांना कळविण्यात लवकरच येईल
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे:
• प्रथम क्रमांक – स्वराज्य युवक मंडळ, भांदुर गल्ली, बेळगांव. (किल्ले – लाहोर)
• दुसरा क्रमांक – श्री शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ, अनगोळ, बेळगांव. (किल्ले – शिवगंगा)
• तिसरा क्रमांक – श्री शाहू युवक मंडळ, शाहूनगर, बेळगांव. (किल्ले – बैरागदुर्ग)
• चौथा क्रमांक – हट्टीहोळ गल्ली, शहापूर, बेळगांव. (किल्ले – रतनगड)
• पाचवा क्रमांक – स्वराज्य युवक मंडळ, संत ज्ञानेश्वर नगर, मजगांव, बेळगांव. (किल्ले – पद्मदुर्ग)
• १ ले उत्तेजनार्थ – बाळ शिवाजी युवक मंडळ, नाथ पै नगर, अनगोळ, बेळगांव. (किल्ले – विजयदुर्ग)
• २ रे उत्तेजनार्थ – श्री हनुमान युवक मंडळ, भांदुर गल्ली, अनगोळ, बेळगांव. (किल्ले – धारूर)



