बेळगाव लाईव्ह : इटगी येथील शाळेच्या आठवीच्या वर्गाच्या श्रेणीवर्धनासाठी ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांनी रस्त्यावर उतरून जो लढा दिला, त्याला आज यश आले आहे.
इटगी येथील शाळा सुरू ठेवण्याबद्दलचा शासकीय आदेश आज जारी करण्यात आला असून, जिल्हा उपसंचालक आणि गटशिक्षणाधिकारी यांना ४२ विद्यार्थिनींचा वर्ग इटगीमध्येच सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या महत्त्वाच्या प्रश्नात वैयक्तिक लक्ष दिल्याबद्दल मी शिक्षणमंत्री श्री. मधु बंगारप्पा, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि प्रधान सचिव रश्मी जी यांच्यासह एआयसीसीच्या सचिव आणि माजी आमदार यांनीही हा प्रश्न उचलून धरला होता.
या सर्वांनी शाळा वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.



