Friday, November 14, 2025

/

कन्नड सक्ती मागे घ्या ; सतीश जारकीहोळी यांना निवेदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह सीमा भागात लागू करण्यात आलेली कन्नड सक्ती त्वरित मागे घ्या अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना करण्यात आली. रविवारी सायंकाळी गोकाक मुक्कामी जारकिहोळी यांची बेळगावातील युवा समितीच्या शिष्टमंडळांना भेट घेत त्यांच्याकडे ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेल्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याची मोहीम युवा समितीच्या वतीने सुरू करण्यात आली असून तत्पूर्वी महापौर मंगेश पवार यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर आज सतीश जारकोहोळी यांना या संदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

बेळगाव सह सीमाभागात होत असलेल्या कन्नड सक्तीला आपण बेळगाव जिल्हाचे पालकमंत्री या नात्याने लक्ष घालून कान्नड सक्ती त्वरित मागे घावी असे निवेदन सादर केले त्यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी मराठी भाषिकांच्यावर कान्नडी सक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे तो अयोग्य असून या आदेशातून विवादित सिमाभागाला वगळून अंमलबजावणी करावी अशी विनंती केली.

 belgaum

जर कदाचित ही कन्नड सक्ती अशीच चालू राहिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणी याचे पडसाद दोन राज्यात उमटतील अशी माहिती दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी आपण यांची माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊन मराठी भाषिकांच्या वर‌ अन्याय होणार नाही यांची काळजी घेऊ असे आश्वासन दिले

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपाध्यक्ष प्रविण रेडेकर, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील,शिवाजी हावळाण्णाचे, अभिजित मजुकर, अशोक घगवे, नारायण मुंचडीकर,भागोजीराव पाटील, निपाणी युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील,सुनिल किरळे, रंजित हावळाण्णाचे, मोतेश बारदेशकर,सचिन दळवी, गजानना शहापूरकर, सुरज कणबरकर,प्रविण गौडर,सुरज जाधव गणेश मोहिते,निलेश काकतकर, श्रीकांत नादूंरकर, राजू नागेश पावले, दिपक लोहार, अनिल देसूरकर, शुभम जाधव, विनायक कांगले, दिपक गुळेनव्वर, अमोल चौगुले,रोहित वायचळ, विशाल सावंत, अभिषेक कारेकर,किरण नार्वेकर, आनंद तुप्पट, अभिषेक तुप्पट,अक्षय पाटील,नागेश सरफ,सुरज जाधव, ज्ञानेश्वर चिकोर्डे, तब्रेज मस्केवाले, राहूल देसूरकर, पवन खाडे,शेखर कोडेकर,चेतन अजरेकर, दिगंबर खांबले, बसवंत गावडोजी,अनिल घडशी प्रशांत बैलूरकर प्रविण पाटील, यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.