Home बातम्या कॅन्टर टेम्पो दुचाकी धडकेत युवक ठार; जांबोटी जवळ अपघात
belgaum

कॅन्टर टेम्पो दुचाकी धडकेत युवक ठार; जांबोटी जवळ अपघात

0
कॅन्टर टेम्पो दुचाकी धडकेत  युवक ठार; जांबोटी जवळ अपघात
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कॅन्टर टेम्पो आणि दुचाकी मध्ये आमोरा समोरा झालेल्या अपघातात एक जण दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे.जांबोटी-चोर्ला रस्त्यावर हब्बनहट्टी क्रॉस ग्रीन हॉटेलच्या नजीक दुचाकी व 407 कॅन्टर टेम्पोमध्ये हा अपघात घडला.

दर्शन मोहन चव्हाण (वय 20 वर्ष) रा. हुबळी असे या घटनेत ठार झालेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव आहे तर राजू कल्लाप्पा शिरपूर रा. हुबळी असे या घटनेतील जखमीचे नाव आहे त्याच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कंटेनर गाडी क्रमांक ( के ए 22 ए ए 9574) चोर्ला मार्गे जांबोटी-बेळगाव कडे जात असलेला टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणे व अति वेगाने टेम्पो चालवून जात असताना, चोर्ला मार्गे गोव्याकडे निष्काळजीपणे अति वेगाने जात असलेल्या दुचाकी क्रमांक (के ए 63 ए एक्स 2459) स्पेलंडर दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला.

अपघातात मयत दर्शन मोहन चव्हाण हा गंभीर जखमी झाला त्याला त उपचारासाठी खानापूरच्या प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्रात दाखल केले मात्र उपचाराचा काहीही उपयोग न झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अपघातातील मयत आणि जखमी झालेले दोघेही रेवडीहाळ तालुका हुबळी जिल्हा धारवाड येथील रहिवासी आहेत.याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.