बेळगाव लाईव्ह :काल मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर-हेमाडगामार्गावरील मनतुर्गा नजीक असलेल्या, हालात्री नदी पुलावर जवळजवळ पाच फूट पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे वाहनधारक व प्रवासी वर्ग पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गा-असोगा-खानापूर या मार्गाचा वापर करीत आहेत.
काल दिवसभर व संपूर्ण रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मणतुर्गा नजीक असलेल्या हालात्री नदी पुलावर पाणी आल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.
पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गा-असोगा-खानापूर या मार्गाचा वापर वाहनधारक करीत आहेत. परंतु खानापूर येथील रेल्वे स्थानकाजवळ असोगा रस्त्यावर रेल्वे मार्गाचे भुयारी काम सुरू आहे.

त्या ठिकाणी पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूची माती ढासळत आहे. ताबडतोब यावर उपाययोजना केली पाहिजे अन्यथा हा मार्ग सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी बेळगाव सह खानापूर तालुक्यात मध्ये दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळा कॉलेजल बुधवारी एक दिवस सुट्टीचा आदेश देण्यात आला आहे. मंगळवारी सुट्टी देण्यात असली तरी बुधवारी सकाळपासून मात्र बेळगाव शहर परिसरात पावसाने काही प्रमाणात उसंथ घेतली आहे. दुसरीकडे खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाचे सत्र चालूच आहे मलप्रभा नदी देखील तुडुंब भरून वाहत आहे एकूणच मंगळवारचा पाऊस सर्वत्र जोर झाला आहे. खानापूर तालुक्यात देखील विविध ठिकाणी एका दिवसात जवळपास 105 ते 106 मी मी पावसाची नोंद झाली आहे.