Monday, May 12, 2025

/

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कोन्नूर मधील सासऱ्यांना काय वाटतं?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्य दलाने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीमुळे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या शौर्याची चर्चा देशभर सुरू आहे. विशेषत: कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सून असल्याने, या कामगिरीचा येथील नागरिकांना विशेष अभिमान आहे.

भारतीय महिलांच्या कुंकवावर आघात करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून देण्यात आलेल्या तगड्या प्रत्त्युत्तरानंतर यासंदर्भात कर्नल सौफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यानंतर आता कर्नल सौफिया कुरेशी कोण आहेत? भारतीय लष्करात त्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत? याबद्दल भारतीयांना कुतुहूल निर्माण झाले असून कर्नल कुरेशी यांचे बेळगावशी नाते असल्याचे समोर आले. कर्नल सौफिया कुरेशी या बेळगावच्या स्नुषा असून त्यांचे सासरे गौससाब बागेवाडी यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात अधिक माहिती देत आपल्या सुनेबद्दल अभिमान व्यक्त केला.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार मारले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या ऑपरेशन सिंदूरची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सून असून, त्यांनी आपल्या धाडसी कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना, त्यांनी दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला कसा केला गेला याचे तपशीलवार वर्णन केले. त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे आहेत.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी यापूर्वी बहुराष्ट्रीय लष्करी पथकाचे नेतृत्व करणार्‍या पहिल्या भारतीय महिला अधिकारी म्हणूनही लौकिक मिळवला आहे. त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे असून ते भारतीय सैन्यात एका मॅकेनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या गुजरात राज्यातील बडोदा येथील असलेल्या कर्नल सोफिया सध्या जम्मूमध्ये सेवारत आहेत. पती-पत्नी दोघेही देशसेवेत कार्यरत असून त्यांच्या कुटुंबात त्यांचे आजोबा आणि वडीलही सैन्यात होते.

आपल्या सुनेने केलेले कर्तबगारीचे कार्य आमच्यासाठी तसेच बेळगाव जिल्हा आणि संपूर्ण राज्यासाठी मान उंचावणारे असून पाकिस्तानचा धर्मसंदर्भात असणारा समज हा चुकीचा आणि हीन पातळीवरचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सर्वजण येथे गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने राहतो. मात्र पाकिस्तानकडून भारतात धर्माचे विष पेरले जाते. पाकिस्तानच्या या हीन कृत्याला भारतीय लष्करी जवानाने चोख प्रत्त्युत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी देखील माध्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. सोफिया कुरेशी यांच्यावर यांचा आपल्याला अत्यंत अभिमान असल्याची प्रतिक्रिया सोफिया यांच्या सासरच्या मंडळींनी दिली असून आम्हाला त्यांच्या भूमिकेवर गर्व आहे, अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बेळगाव जिल्ह्यातील नागरिक त्यांच्या शौर्याचा विशेष गौरव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.