बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील शहापूर पोलीस स्थानकासमोर काल रात्री झालेल्या आंदोलनाचा व्हिडिओ वर आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शहापूर पोलीस अधीक तपास करत आहेत. बीएनएस 2023 192 अंतर्गत शापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
धर्मग्रंथ विटंबना प्रकरणी वादग्रस्त कॉमेंट केलेल्या वर कारवाई करावी अशी मागणी करत काय विशिष्ट समाजाच्या युवकांनी शहापूर पोलीस तालुका समोर आंदोलन केले होते, त्या आंदोलनाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसारित झाला होता अशा व्हिडिओवर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या वर पोलिसांनी कारवाई केली आहे.
दरम्यान कोणतीही पूर्वसूचना नसताना बेकायदेशीररित्या पोलीस स्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव गोळा केल्यास देखील कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी समाज माध्यमावर आक्षेपार्ह कमेंट करू नये शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.