बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या नगर नियोजन आणि सुधारणा स्थायी समितीची बैठक बुधवार दि. 21 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीच्या विषय पत्रिकेवर पुढील प्रमाणे विषय असणार आहे. 1) मागील गेल्या 28 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी देणे. 2) किल्ला तलाव येथे रस्त्यावरील दिव्याच्या एरियल बोन्च केबल घालणे. 3) महापालिकेच्या निधी अंतर्गत रस्त्याचे सखल भाग भरणे, ड्रेनेज दुरुस्ती आणि देखभाल, गणेश उत्सव, अधिवेशन, बोरवेल दुरुस्तीचे काम.
4) बेळगाव महापालिकेच्या अखत्यारीतील प्रभाग क्र. 35 आणि श्रीनगर सेक्टर क्र. 5 मधील चन्नम्मा हाऊसिंग सोसायटीमध्ये पथदिपांचे खांब बसवणे. 5) महापालिकेच्या 2025 -26 निधी अंतर्गत उत्सव, वर्धापनदिनानिमित्त आणि मान्यवरांच्या आगमनाच्या वेळी करावयाच्या तातडीच्या कामाच्या मंजुरीबाबत.
6) महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात पार्किंग शेड बांधण्याबाबत. 7) अध्यक्षांच्या परवानगीने इतर कोणताही विषय. तरी नगर नियोजन आणि सुधारणा स्थायी समितीच्या संबंधित सदस्यांसह अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे, असे महापालिकेच्या कौन्सिल सेक्रेटरींनी कळविले आहे.