Tuesday, November 11, 2025

/

उन्हाळ्यात पेयजलाची कमतरता नये -जि. पं. सीईओंची सूचना

 belgaum

बेळगाव लाईव्ह :उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही या दृष्टीने आवश्यक क्रम हाती घेण्यात यावेत, अशी सूचना बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली.

कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील बहुग्राम पिण्याचे पाणी अर्थात पेयजल पुरवठा केंद्राला काल मंगळवारी दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.

लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या पाण्याच्या टाकीची दर 15 दिवसातून एकदा व्यवस्थित स्वच्छता केली जावी.

 belgaum

Zp ceo rahul shinde कारण या भागात उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असते. तेंव्हा येथील जनतेसह जनावरांना पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जावी, अशा सूचना सीईओ राहुल शिंदे केल्या.

याप्रसंगी जिल्हा पंचायत उप कार्यकारी अधिकारी बसवराज आडवीमठ, कागवाड तालुका कार्यकारी अधिकारी विरण्णा वाली, अथणी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी शिवानंद कल्लापूर, ग्रामीण पेयजल खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता रवींद्र मुरगाली आदींसह संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.