Wednesday, April 23, 2025

/

हनुमाननगर येथे तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलिस विभागाची संयुक्त कारवाई

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये कोटपा-2003 कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलिस विभागाच्या सहकार्याने विशेष कारवाई करण्यात आली.

बेळगावमधील हनुमान नगर परिसरात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत कोटपा-2003 (सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने नियंत्रण कायदा) अंतर्गत धूम्रपान करणाऱ्या आणि तंबाखूची जाहिरात करणाऱ्या 18 प्रकरणांची नोंद करण्यात आली.

शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस देण्यात आली, तसेच तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली. कोटपा-2003 कायद्याच्या कलम-4 नुसार ‘धूम्रपान निषिद्ध’ अशी नामफलकं वितरित करण्यात आली.

या विशेष कारवाईत राज्य तंबाखू नियंत्रण विभागाचे संशोधक महांतेश उळगड्डी, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या सल्लागार श्वेता पाटील, समाज कार्यकर्त्या कविता राजण्णावर आणि पोलिस विभागाचे एम. आय. हनबर यांनी सहभाग घेतला.

जिल्हा तंबाखू नियंत्रण अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखू उत्पादनांची जाहिरात आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.