belgaum

मोहनगा भावेश्वरी देवीची यात्रा सुरू

0
479
Mohanaga
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील हुक्केरी तालुक्यातील मोदगे (मोहनगा) श्री भावेश्वरी देवीचा वार्षिक यात्रोत्सव गुरुवार 13 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.

पाटील ट्रस्ट कमिटी मोदगे आणि श्री बारकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी मोदगे मुंबई यांच्याकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात यात्रोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी शस्त्र इंगळ्या (शुक्रवारी सकाळी सहा पर्यंत सुरूच राहतील) शुक्रवार 14 फेब्रुवारी रोजी भर यात्रा आणि शनिवार 15 फेब्रुवारी रोजी पालखी सोहळा आणि यात्रा समाप्ती

 belgaum

बेळगाव जिल्हा सह कोल्हापूर मुंबई आणि कर्नाटकातून लाखो भाविक दरवर्षी यात्रेला मोदगे येथे येत असतात गुरुवारी दुपारी पासून बेळगाव शहरातून मोहनगा यात्रेला जाण्यासाठी विशेष बस सेवा देखील सुरू होणार आहे.

सध्या बेळगाव परिसरात यात्रा जत्रा सुरू असून या यात्रेला देखील मोठी गर्दी होणार आहे भाविकांना याची नोंद घ्यावी असे आवाहन  मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.