Thursday, December 5, 2024

/

महाराष्ट्रातील निवडणुका : सीमेवर दारू बंदीचा आदेश

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येत्या दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असून मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर कर्नाटक हद्दीत बेळगाव जिल्ह्यलगत असलेल्या सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील कर्नाटकातील 5 कि.मी. परिघामध्ये बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, त्याचप्रमाणे दि. 22 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजल्यापासून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी असणार आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायदा आणि नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.