बेळगाव लाईव्ह: राकसकोप जलाशयाचे तीन दरवाजे उघडून दोन इंचाने पाण्याचा विसर्ग गुरुवारपासून (दि. १८) सुरु झाल्याने मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीला पूर आल्यानंतर हिंडलगा पंपिंग सेंटरमध्ये पाणी शिरते. यावेळेस हा प्रकार होऊ नये म्गणून एलॲण्डटी कंपनीने खबरदारी घेतली आहे. पाणी शिरल्यास यंत्रणा हलविण्यासाठी एक पथक तैनात ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शनिवारी पाहणी करुन कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले तर लक्ष्मीटेक जलशुद्धीकरण केंद्रावर परिणाम
होऊन शहराचा पाणीपुरवठा कोलमडतो.
यासाठी महापालिका आयुक्त दुडगंटी यांनी पाहणी करुन सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यास तेथील यंत्रणा किमान पाच फूट उंच उचलण्याची प्रक्रिया तातडीने करण्यासाठी एलॲण्डटी कंपनीने एक पथक सज्ज ठेवले आहे.
मार्कंडेय नदीची पाणी पातळी वाढली की ते पाणी पंपींग सेंटरमध्ये शिरते. त्यामुळे, येथील यंत्रणा पाण्यात बुडते. परिणामी पाण्याचा उपसा ठप्प होतो. गेल्या काही वर्षात असे प्रकार सातत्याने घडले आहेत.
यासाठी पाणी उपसा करणारे पंप उचलून वर टांगले जातात. दरवेळेस राकसकोप जलाशयाचे दरवाजेपाच इंचाने उघडले जातात. त्यामुळे, मार्कंडेय नदीला लवकर पूर येतो. पण, यंदा ते टाळण्यासाठी दरवाजे केवळ दोन इंचांनी उचलण्यात आले आहेत.
संततधार पाऊस पडल्याने राकसकोप्प जलाशयात जमा होणारी पाण्याची आवक बादली असून जलाशय तुटुंब हाते हे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अर्धा फूट पाण्याची गरज आहे पण, दोन दिवसांपूर्वी दोन दरवाजे उघडून पाणीपातळी योग्य प्रमाणात राखण्याव आली आहे त्यात पावसाची संततधार सुरु आल्याने तीन दरवाजे दोन इंचांनी उघडून पाहणी मार्कडेय नदीत सोडले जात आहे.
शुक्रवारी (दि. १९) जलाशयाची पाणी पातळी २.४०३.७० फूट होती शुक्रवारी रात्री पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत गेली त्यामुळे, शनिवारी (दि. २०) सकाळी सात वाजता पाणी पातळी २.४०४.५० फुटावर पोचली आहे.जलाशय परिसरात शनिवारी सकाळ पर्यंत 49.8 मी मी पावसाची नोंद झाली आहे.