बेळगाव लाईव्ह : हेस्कॉमने विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने रविवार दि. 2 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 यावेळेत शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
ऑटोनगर, कणबर्गी, रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवण कुडची, रेड्डी भवन, जैन मंदिर, विश्वेश्वरय्यानगर, पाणीपुरवठा मंडळ कार्यालय, आदर्श कॉलनी, जाधवनगर, संपिगे रोड, बुडा कॉम्प्लेक्स, हनुमाननगर,
चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर, अंजनेयनगर, महांतेशनगर, अशोकनगर, क्लब रोड, सीपीएड, वनिता विद्यालय, गणाचारी गल्ली, काकतीवेस, चांदू गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट, कॉलेज रोड, काळी आमराई, वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, केएलई परिसर, एपीएमसी,
उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, आयोध्यानगर, सुभाषनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, डॉ. आंबेडकर रोड, मुरलीधर कॉलनी,
कोल्हापूर सर्कल, रेलनगर या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.