Saturday, July 13, 2024

/

सवलतीच्या बिग सेल फर्निचर प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद

 belgaum

बेळगाव लाईव्ह:प्रामुख्याने अतिशय नाविन्यपूर्ण डिझाईन्सचे आकर्षक सोफा सेट्स तसेच बेड्स, कपाटं वगैरेंचे ‘बिग सेल फर्निचर एक्झिबिशन हाफ प्राइस’ हे एक्सचेंज ऑफरसह तब्बल 70 टक्के सवलतीच्या दरातील विक्री प्रदर्शन सध्या बेळगाव कोर्टासमोरील सिमंड्स हॉलमध्ये सुरू असून त्या विक्री प्रदर्शनाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

बेळगाव कोर्टासमोरील सिमंड्स हॉलमध्ये गेल्या बुधवारपासून ‘बिग सेल फर्निचर एक्झिबिशन हाफ प्राइस’ या विक्री प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे. सदर प्रदर्शनाचे मालक बेळगावचे दयान सौदागर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रामुख्याने सोफा सेट्सचे हे विक्री प्रदर्शन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सोफासेट -फर्निचर विक्री प्रदर्शन आहे.

या प्रदर्शनात 10 हजारापासून ते 37 हजार रुपयांपर्यंतचे आकर्षक सोफा सेट्स उपलब्ध असून दरात 70 ते 85 टक्के सूट दिली जात आहे. विशेष म्हणजे या विक्री प्रदर्शनात 5 वर्षाच्या हमीचे अर्थात गॅरंटीचे इम्पोर्टेड सोफासेट, नॉर्मल सोफासेट, थ्री प्लस वन -वन, इंडियन सोफा सेट कॉर्नर, इम्पोर्टेड सोफा सेट कॉर्नर वगैरे विविध प्रकार व डिझाइन्सचे आकर्षक सोफा सेट्स मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

घरातील जुना सोफा सेट बदलून माफक दरात चांगला नवीन सोफा सेट खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर म्हणजे या विक्री प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘एक्सचेंज ऑफर’ सुरू आहे. प्रदर्शनात जुने सोफासेट अत्यंत माफक दरात बदलून दिले जात आहेत.Furniture

सोफासेट व्यतिरिक्त सदर प्रदर्शनात विविध डिझाईन्सची कपाटे, बेड्स वगैरे फर्निचरची देखील विक्री सुरू आहे. मर्यादित कालावधीसाठी आयोजित सदर ‘बिग सेल फर्निचर एक्झिबिशन हाफ प्राइस’ हे विक्री प्रदर्शन येत्या सोमवार दि. 17 जून 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.

सदर विक्री प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून प्रदर्शनाला नागरिकांनी सहकुटुंब भेट द्यावी आणि आपल्या पसंतीचे सोफासेट अथवा अन्य फर्निचर खरेदी करून प्रचंड सवलतीच्या दराच्या ऑफरचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन विक्री प्रदर्शनाचे आयोजक दयान सौदागर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.