Saturday, December 7, 2024

/

सांबरा श्री महालक्ष्मी यात्रेला अपूर्व उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :तब्बल 18 वर्षानंतर प्रथमच सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला आज मंगळवारी सकाळपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात भक्तीभावाने प्रारंभ झाला आहे.

परंपरेनुसार आज मंगळवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे सूर्योदयानंतर अक्षतारोपण होऊन मंगलाष्टकांसह श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा जल्लोषात संपन्न झाला. याप्रसंगी श्री महालक्ष्मी देवी मंदिर परिसरातील सर्व रस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेले होते.

देवीच्या विवाहनंतर सर्वप्रथम यात्रा कमिटी आणि मागोमाग हक्कदारांचा ओटी भरणे कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रम विधिवत पार पडल्यानंतर आज दुपारी 1 वाजता श्री लक्ष्मीदेवी व्हन्नाटासाठी अर्थात खेळण्यासाठी उठणार आहे. व्हन्नाट करून देवी सायंकाळी 4 वाजता रथावर आरुढ होणार आहे.

रथातून श्री महालक्ष्मी देवी चावडी गल्लीपर्यंत कांही अंतर प्रवास करणार आहे. देवीचा सदर रथोत्सव आजपासून सलग चार दिवस होणार आहे. या रथोत्सवानंतर येत्या शुक्रवारी श्री महालक्ष्मी देवी गदगेवर बसणार असून बुधवारपर्यंत देवी गदगेवर बसल्यानंतर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.Sambra

सांबरा श्री महालक्ष्मी यात्रेमधील 60 फूट उंचीचा रथ सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे रथाचे काम उत्कृष्ट झाले असून रथावर विविध देव देवतांची चित्रे साकारण्यात आली आहेत. काल सोमवारी सायंकाळी रथावर कळस चढविण्यात आला.Sambra yatra

गावातील कारागिरांनी गेले अनेक दिवस परिश्रम घेऊन रथाचे काम पूर्ण केले असून सध्या हा मनमोहक रथ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेदरम्यान मारीहाळ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त राहणार असून यात्रा कमिटीच्यावतीने बाऊन्सर्सची नेमणूकही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्य परिवहन मंडळाच्या बस फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेतSambra yatra

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.