Saturday, July 13, 2024

/

खासबागच्या मत्तीकोप विहिरीचा होतोय कायापालट

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्यास फाऊंडेशन, एकेपी फेरोकास्ट आणि बेम्को यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे खासबाग येथील ब्रिटिशकालीन मत्तीकोप विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात येत असून तिचा पूर्ववत कायापालट केला जात आहे.

खासबाग मत्तीकोप विहीर एक 150 वर्षे जुनी ब्रिटिश कालीन विहीर असून जिथे एकेकाळी संपूर्ण टिळकवाडी, शहापूर आणि खासबाग पोहायला शिकले होते. मात्र कालांतराने ही विहीर दुर्लक्षित झाली झाले आणि गाळ, केरकचरा, झाडे झुडपे यामुळे तिने तिचे पात्र गमावले.

आता जवळपास 60 वर्षानंतर प्यास फाऊंडेशन, एकेपी फेरोकास्ट आणि बेम्को यांनी संयुक्तरित्या या विहिरीच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केल्यामुळे विहिरीचे स्वरूप पालटण्यास सुरुवात झाली आहे.

जवळजवळ 30 फूट खोली असलेली ही विहीर कमालीच्या उन्हाळ्यात निळ्याशार पाण्याने काठोकाठ भरलेली असते.

खासबागची ही मत्तीकोप विहीर दररोज अंदाजे 1000 टँकर पाणी पुरवू शकते आणि तरीही ती कोरडी पडणार नाही. हीच शहरासाठी निर्माण झालेली संपत्ती असून आता विहीर बांधून तिच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.