Wednesday, October 9, 2024

/

चन्नेवाडी शाळा पूर्ववत होईल सुरू -बीईओचे आश्वासन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गटशिक्षणाधिकारी आणि आमदारांच्या आश्वासनामुळे गेल्या 7 -8 वर्षांपासून बंद असलेल्या चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील शाळा सुरू करण्याच्या पालक व गावकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत .

चन्नेवाडी येथील गावकरी मंडळी व पालकांनी आज मंगळवारी खानापूर गटशिक्षणाधिकारी (बीईओ) श्रीमती राजश्री कुडची यांची भेट घेऊन गावातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील मागणीचे निवेदन सादर केले.

शाळा तात्कालीन शिक्षकांच्या मनमानी वागण्यामुळे कशी बंद पडली व त्यानंतर गावातील विद्यार्थ्याची शाळेअभावी कशी गैरसोय झाली याची संपूर्ण माहिती यावेळी राजश्री कुडची यांना देण्यात आली. गेल्या कांही महिन्यांपूर्वी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही शाळेला भेट देऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. पुन्हा गावकऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करत गटशिक्षणाधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या व पालकांच्या सह्यांचे निवेदन देऊन आमदारांशी संपर्क साधला होता.Beo khanapur

आता चन्नेवाडीतील शाळा सुरू करण्याच्या मागणीला व पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. कारण गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आजच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ. तसेच सद्य परिस्थितीत प्रतिशिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कार्यवाही करू, असे आश्वासन दिले आहे.

नुकतेच आमदारांनी देखील तसेच आश्वासन दिले आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी विठ्ठल पाटील, मुरलीधर पाटील, धनंजय पाटील, सुधाकर पाटील, शंकर पाटील, दत्ताराम पाटील, उदय पाटील आदींसह ग्रामस्थ व पालक हजर होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.