Friday, May 24, 2024

/

चिकोडीत भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चप्पलने जुंपली!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता प्रत्येकाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. दरम्यान चिकोडी लोकसभा मतदार संघात भाजप – काँग्रेस समर्थकांमध्ये चप्पल घेऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपलाच उमेदवार जिंकणार या विषयावरून दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाले. दोन्ही पक्षातील समर्थक दारूच्या नशेत एकमेकांशी वाद घालत होते.

दरम्यान या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले आणि एकमेकांना चप्पल घेऊन मारण्यापर्यंत हा वाद पोहोचला. यावेळी बघ्यांची गर्दी जमली आणि सुरु असलेला हा वाद मोबाईलमध्ये कैद झाला. बघता बघता हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये रूपांतरित झाला आणि काही क्षणातच वायरल झाला. हा सारा प्रकार चिकोडी नगरपालिकेनजीक असणाऱ्या कर्नाटक वाईन्स समोर घडला होता.

 belgaum

लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, संसद भवन असो किंवा विधानभवन किंवा ग्रामपंचायत, सभागृह एकच असते. सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र बसून एकाच खुर्चीवर बसून आपला राज्यकारभार चालवत असतात.Chikodi

ते सर्वजण एकमेकांचे मित्र होतात आणि आपण एकाच गल्लीत, वॉर्डमध्ये, गावात राहणारे असूनही एकमेकाला चप्पलने मारू लागलो आणि आपापसात भांडण करून एकमेकांसोबत शत्रुत्व ओढवून घेऊ लागलो तर आपण हे सर्व कुणासाठी करतो आहोत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.Sambra yatra

नेते एक होतात. पण त्यांचा संदेश घेऊन कार्यकर्त्यांनी का भांडायचे? आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे. मतभेद असले तरी हरकत नाही परंतु मनभेद न ठेवता एकत्र नांदणे गरजेचे आहे. त्यामुळे दुसऱ्यासाठी एकमेकांवर चप्पल उगारणे यात कोणतेच शहाणपण नाही, हे चिकोडीमध्ये झालेल्या घटनेवरून दिसून येते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.