Wednesday, April 17, 2024

/

बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी जारकीहोळींची वर्णी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी अरभावी मतदार संघाचे आमदार आणि केएमएफचे संचालक भालचंद्र जारकीहोळी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सभागृहात संचालक मंडळातून भालचंद्र जारकीहोळी यांचा एकमेव उमेदवार अर्ज अध्यक्षपदासाठी सादर करण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

माजी अध्यक्ष विवेकराव पाटील आणि संघातील सर्व सदस्यांनी सर्वानुमते निवड केल्याबद्दल भालचंद्र जारकीहोळी यांनी सर्वप्रथम आभार मानले. यानंतर बोलताना ते म्हणाले, सहकार खात्यात सुधारणा करण्यास सरकार उत्सुक आहे. बेळगाव दूध संघाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने निःपक्षपातीपणे मी काम करेन.Bhalchabdr J

 belgaum

जिल्हा दूध संघासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रायबाग, गोकाक, मुडलगी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा करतात. मात्र, महाराष्ट्रात निपाणी, कागवाड, चिक्कोडी, अथणी तालुक्यातील शेतकरीच दूध पुरवठा करतात. बैलहोंगलमधील शेतकरी दूध व्यवसायावर अधिक भर देत नाहीत. तर कोलार जिल्ह्यात पाणीटंचाई असतानाही तेथील शेतकरी दुग्धव्यवसायाला प्राधान्य देत असून उत्तर कर्नाटकातही अशा संधीचा सदुपयोग करून दुग्धव्यवसाय वाढला तर संपूर्ण शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल, असे मत भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक बाबू कट्टी, मल्लप्पा पाटील, कल्लाप्पा गिरेन्नावर, डॉ. बसवराज परन्नावर, बाबुराव वाघमोडे, वीरूपाक्षी ईटी, रायप्पा डुग, प्रकाश अंबोजी, संजय शिंत्री, सत्तेप्पा वारी, शंकर सिदनाळ,महादेव बिळीकुरी, रमेश अन्नीगेरी, सविता खानाप्पगोळ, व्यवस्थापकीय संचालक एम. कृष्णप्पा आदी उपस्थित होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या रजिस्ट्रार राजश्री जैनापुरे यांनी रिटर्निंग अधिकारी म्हणून काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.