Saturday, May 18, 2024

/

सकाळी सकाळी बेळगावात गजराज!

 belgaum

बेळगाव लाईव्ह:शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरालगत हत्ती दाखल झाल्याची घटना बसव कॉलनी बी के कंग्राळी परिसरात घडली आहे.

हत्ती बसव कॉलनी परिसरात दिसल्याने नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती  जंगलातून आलेला हत्ती आता महापालिका व्याप्ती पर्यंत पोहोचला आहे.

बसव कॉलनी बॉक्साइट रोड परिसरात ज्यावेळी हत्ती दिसला त्यावेळी अनेकांना आनंद झाला तर कित्येक जणांना भीती देखील वाटली यावेळी अनेकांनी हत्ती  पाहायला गर्दी केली कित्येक जण आपल्या मोबाईलवर हत्तीचे चित्रण करून घेण्यात दंग होते.Elephant

 belgaum

जंगलातील हत्ती रहिवासी परिसरात दाखल झाल्यामुळे भीती मुळे अनेकांनी वन खात्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. आपल्या घरच्या परिसरात हत्ती आल्याचे पाहून लहान या मुलांमध्ये आनंद व्यक्त होत होता.

वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार बसव कॉलनी परिसरात आलेला हत्ती काकतीच्या जंगलामधून अन्न किंवा पाण्याच्या शोधात शहराकडे आला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वनखाते बसव कॉलनी परिसरात दाखल झाले असून हत्तीला पुन्हा जंगलाकडे  हिसकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.