Wednesday, April 17, 2024

/

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

 belgaum

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस साजरा करत  नागेश देसाई यांनी सामाजिक संदेश दिला आहे.

सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई उर्फ मामी शंकरराव देसाई यांचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस आज गुरुवारी सकाळी शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मंगळवार पेठ, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सांबरा येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते असलेल्या माजी जि. पं. सदस्य नागेश शंकरराव देसाई यांनी आज आपल्या आई लक्ष्मीबाई यांचा वाढदिवस आगळ्या पद्धतीने उत्साहात साजरा केला.Birthday

 belgaum

आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त लक्ष्मीबाई उर्फ मामी देसाई यांनी गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. याखेरीज आपल्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीबाई यांनी आज सकाळी 6 वाजता मारुती गल्ली, सांबरा येथील छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घातला.

त्याचप्रमाणे पुष्पहार अर्पण करून मूर्तीचे पूजन करण्याद्वारे शिवरायांना अभिवादन केले. यावेळी झालेल्या आरती कार्यक्रमाला नागेश देसाई यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय, गावातील बंधू-भगिनी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.