Thursday, May 9, 2024

/

सांबऱ्यानजीक कार अपघातात महिला ठार, 1 जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सांबरा गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार गाडी 70 ते 80 फूट फरपटत उलटीपलटी होत रस्त्याशेजारी शेतात जाऊन पडल्यामुळे घडलेल्या अपघातात 1 महिला ठार तर अन्य एक जण जखमी झाला. काल शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार (क्र. टीएन 75 झेड 1686) शुक्रवारी मध्यरात्री भरधाव वेगाने बेळगावहून सांबऱ्याकडे निघाली होती.

सांबरा गावाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्यावरून सुमारे 70-80 फूट फरफटा.त उलटी पलटी होऊन शेजारील शेतात जाऊन पडली.

 belgaum

परिणामी गाडीतील एक महिला ठार झाली आहे तर अन्य एक जण जखमी झाला आहे. भर वेगात फरफाटात उलटी पलटी होऊन पडल्यामुळे कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघाताची मारीहाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.