Saturday, December 7, 2024

/

पोलीस ठाण्यासमोर वकिलांची निदर्शने

 belgaum

बेळगाव लाईव्ह : युवा वकिलावर हल्ला करणाऱ्या प्रमुख हल्लेखोरासह इतर हल्लेखोरांना गजाआड करण्यास विलंब लावला जात असल्याच्या निषेधार्थ आज संकेश्वर पोलीस ठाण्यासमोर वकिलांनी जोरदार निदर्शने केली.

संकेश्वर येथील युवा वकील ॲड. सागर माने यांना एका गटाच्या पक्षकारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याच्या रागातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजते.

सदर हल्ला झाल्यानंतर प्रमुख हल्लेखोरासह अन्य हल्लेखोरांना गजाआड करण्यात पोलिसांकडून विलंब होत असून या निषेधार्थ तसेच हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी संकेश्वर येथील समस्त वकिलांनी आज सकाळी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडून जोरदार निदर्शने केली. त्यामुळे काही काळ वातावरण तापले होते.

मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या संकेश्वरच्या वकिलांनी मोठ्या संख्येने जमून ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

तसेच पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. इतर हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.