Tuesday, April 30, 2024

/

मारुती गल्लीत दुकानाला आग, लाखोंचे नुकसान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मारुती गल्ली, बेळगाव येथील, सत्कार हॉटेल बाजूच्या कॉम्प्लेक्स मधील बेसमेंट मधील ब्लॅक ब्युटी नावाच्या स्टेशनरी दुकानाला शॉर्टसर्किट मुळेआग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गत वर्षी याच दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आता पुन्हा दुसऱ्यांदा आग लागल्याने संबंधित व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.Maruti glii

मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली असून आग लागल्यानंतर मारुती गल्लीत एकच गोंधळ उडाला होता.आग लागताच तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

 belgaum

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.आगीची घटना घडताच या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.