बेळगाव लाईव्ह :
/ अखिल भारत लिंगायत पंचमसाली महासभेच्या बेळगाव जिल्हा घटकातर्फे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली आहे. २०२४ मध्ये सुवर्ण सौधसमोर झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत १० डिसेंबर २०२६ रोजी काळ्या पट्ट्या बांधून शांततेत निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जगद्गुरू श्री जयमृत्यूंजय महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचमसाली समाजाला २ अ आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मागील आंदोलनातील घटनेमुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी हे निवेदन सादर करून सुवर्ण सौधसमोर शांततेत निदर्शने करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.

यावेळी बेळगाव जिल्हाध्यक्ष निंगप्पा फिरोजे, बेळगाव जिल्हा युवा घटक जिल्हाध्यक्ष गुंडू पाटील, बेळगाव शहर घटक मानद अध्यक्ष राजू मगदूम, आर. सी. पाटील, एल. पी. ए. पी. चे कार्याध्यक्ष आर. पी. पाटील, शहर घटक अध्यक्ष शिवानंद तंबाके आणि रयत संघर्ष समितीचे अध्यक्ष अडिवेश इटगी आदी उपस्थित होते.




