Monday, May 13, 2024

/

सिलेंडर गॅस गळती घराला आग चार जण गंभीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील बसवान गल्लीत सिलेंडर गॅस ला गळती झाल्याने घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की बसवणं गल्ली बेळगाव  मधील मोहन गोपाळ कृष्ण भट यांच्या घराला सिलेंडर गॅसला गळती झाल्याने आग लागली त्यावेळी घरात असले  चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर एकाला किरकोळ इजा पोचली आहे.

घटनास्थळी खडे बजार पोलिसांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले आहे. केवळ सिलेंडर गॅस च्या गळतीमुळे घराला आग लागली आणि त्यामुळे ही घटना घडली मात्र सुदैवाने या घटनेत सिलेंडरचा स्फोट झाल्या नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.