Monday, May 20, 2024

/

डॉ. आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन गांभीर्याने

 belgaum

बेळगाव लाईव्ह :जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने बेळगाव शहरातील विविध दलित संघटनांतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज गांभीर्याने आचरणात आणण्यात आला.

शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आज बुधवार सकाळी या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री मुनिअप्पा, मंत्री नागेंद्र आदींसह जिल्हाधिकारी नितेश पाटील शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित होते.Krishna

जिल्हा पालक मंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते उद्यानातील डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 belgaum

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व दलित नेते मल्लेश चौगुले, सिद्धाप्पा कांबळे, जीवन कुरणे, महादेव तळवार, सुधीर चौगुले, रामा चव्हाण, विनोद सोलापुरे, रामानंद मेत्री, आनंद कोलकार, संतोष हलगेकर आदींसह शहर परिसरातील विविध दलित संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना दलित नेते मल्लेश चौगुले म्हणाले की, विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आज आपल्या देशाचा जगभरात साजरा केला जात आहे. डॉ. आंबेडकरांमुळे आज महिलांना तसेच 85 टक्के बहुजन समाज बांधवांना न्याय मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशात जन्म घेतला नसता तर पूर्वीची मनुवादी परिस्थिती आजही कायम राहिली असती. डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानामुळे आज आपल्या देशातील सर्वांना न्याय मिळत असून प्रत्येक जण ताठ मानेने जगत आहे. मात्र दुर्दैवाने या महान व्यक्तिमत्त्वाच्या पुण्यतिथी आणि जयंती आचरणात आणल्या जातात त्यांचे आचार -विचार मात्र आचरणात आणले जात नाहीत. त्यांनी घालून दिलेल्या पायंड्यानुसार मार्गक्रमण केले जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यासाठी भावी पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार -विचार आचरणात आणून स्वतःसह आसपासचा समाज, आपले गाव, आपला देश उद्धार करावा. आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन, सोशल मीडिया वगैरेंद्वारे आपली युवा पिढी भरकटत चालली आहे. युवा पिढीने चांगले शिकून संघटित होऊन मग संघर्षासाठी सिद्ध झाले पाहिजे तरच त्यांचा स्वतःचा आणि देशाचा उद्धार होणार आहे असे सांगून सर्वांनी एकोप्याने संघटित राहून डॉ. बाबासाहेबांचा वारसा जपावा असे आवाहन चौगुले यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.